चीनच्या एका रस्त्यावर एक महिला चक्क स्वत:चेच दूध विकताना दिसत आहे. वय वर्षे २४ असलेली ही महिला आई असून, तिला एक छोटी मुलगी आहे. आपल्या मुलीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे जमा करत आहे. तिच्या या कामात तिला तिचा पतीही मदत करत आहे. ही महिला रस्त्यावर दूध विकत असताना तिचा पती तिच्या बाजूला एक फलक घेऊन उभा आहे. फलकावर लिहीले आहे, 'सर्व वयोगटातील लोकांसाठी आम्ही ही सेवा देत आहोत. एक मिनीट स्तनपानाच्या बदल्यात १० यूआन इतका मोबदला द्यावा लागेल. आपले सहकार्य अपेक्षीत आहे. धन्यवाद!'.ही महिला चीनच्या शिनजियांग प्रांतातील आहे. आपल्या हातातील फलकावर महिलेने संपूर्ण माहिती दिली आहे. महिलेने म्हटले आहे, 'माझे वय २४ वर्षे आहे.मी पूर्णपणे निरोगी असून, माझ्या बाळावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे बील देण्यासाठी मी रस्त्यावर दूध विकत आहे.कोणताही व्यक्ती बील देऊन ऑनसाईट ब्रेस्टफीडींग करू शकतो. आपल्या सहकार्याबद्धल धन्यवाद'.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews